सोमाटणे टोलनाक्यावर रूग्णवाहिकांची कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमाटणे टोलनाक्यावर 
रूग्णवाहिकांची कोंडी
सोमाटणे टोलनाक्यावर रूग्णवाहिकांची कोंडी

सोमाटणे टोलनाक्यावर रूग्णवाहिकांची कोंडी

sakal_logo
By

सोमाटणे, ता. २ ः सोमाटणे टोलनाक्यावर रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्गिका नसल्याने वाहनांच्या अडथळ्यातून मार्ग काढण्याची पाळी रुग्णवाहिका चालकावर येते. सोमाटणे येथील टोलनाक्याजवळ असलेला अरुंद रस्ता, टोल बूथची मर्यादित संख्या, टोल वसुलीत गर्क असलेले कर्मचारी, दररोज सकाळ संध्याकाळ वाहनांची वाढणारी संख्या यामुळे सतत येथे वाहतूक कोंडी होते. त्यातच या टोल नाक्यावर रुग्णवाहिका व व्हीआयपीसाठी स्वतंत्र मार्गिका नाही. याची सर्वाधिक झळ रुग्णांना सहन करावी लागते. प्रसंगी रुग्णाच्या जिवावर बेतण्याची शक्यता असते. सोमाटणे हे तालुक्यातील रुग्णालयांचे हब असल्याने अपघातातील जखमींसह सर्व प्रकारच्या गंभीर आजारातील रुग्णांना उपचारासाठी येथे जलद आणण्याची आवश्यकता असते. परंतु वाहतूक कोंडीमुळे ते अशक्य होते. वाहतूक कोंडी झाल्यावर टोल न घेता वाहने सोडण्याऐवजी टोल कर्मचारी टोल वसुलीत गर्क असल्याने टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी आणखी वाढते. या कोंडीतून रुग्णवाहिका चालकाला अडथळ्यातून मार्ग शोधत कसरत करावी लागते. ही कसरत करूनही तो रुग्णाला वेळेत रुग्णालयात आणण्याची शक्यता कमीच असल्याने रुग्णाच्या जिवावर बेतण्याचा धोका कायम असतो. ही समस्या सोडण्यासाठी टोलनाका सोमाटणे येथून अन्यत्र हलवावा, अशी मागणी जनसेवा विकास समितीसह रुग्णवाहिका चालकांनी केली आहे.
-----------------------------------------------------------------------------------