गंध गाभारा कार्यक्रमात उलगडला इंदिरा संत यांचा काव्यप्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गंध गाभारा कार्यक्रमात उलगडला
इंदिरा संत यांचा काव्यप्रवास
गंध गाभारा कार्यक्रमात उलगडला इंदिरा संत यांचा काव्यप्रवास

गंध गाभारा कार्यक्रमात उलगडला इंदिरा संत यांचा काव्यप्रवास

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः निसर्ग, प्रेम, विरह, ओव्या, स्त्री भावनांवर काव्यरचना करणाऱ्या कवयित्री इंदिरा संत यांचा काव्यप्रवास ‘गंध गाभारा’ कार्यक्रमातून मांडण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरीचिंचवड शाखेतर्फे आयोजित कार्यक्रम प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात झाला. माजी नगरसेविका शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्त्या सरिता साने, परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ उपस्थित होते. किरण लाखे यांची संहिता होती. डॉ. समिता टिल्लू, इला पवार, जयश्री श्रीखंडे व प्राची कुलकर्णी यांनी विविध रचना सादर केल्या. तसेच, कुसुमाग्रज यांच्या कणा, आगगाडी आणि जमीन, विजयोन्माद, पृथ्वीचे प्रेमगीत, पाचोळा या कविता, विनीता श्रीखंडे, मंगला पाटसकर, नंदकुमार मुरडे, सुनिता बोडस, अंजली नवांगुळ यांनी रसग्रहणासह सादर केल्या. राजन लाखे यांनी प्रास्तविक केले. माधुरी मंगरूळकर यांनी सूत्रसंचालन केले.
--