Sat, April 1, 2023

सत्तावीस टन
कचरा संकलन
सत्तावीस टन कचरा संकलन
Published on : 1 March 2023, 1:29 am
पिंपरी, ता. १ ः महापालिका ‘क’ क्षेत्रीय कार्यालय व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आयोजित प्लॉगेथॉन अर्थात स्वच्छता मोहिमेत २७.२८ टन कचरा संकलन केला. यात ओला कचरा २.२ टन व सुका कचरा २५.८ टन होता. तो १६ वाहनांद्वारे मोशी डेपोत नेण्यात आला. स्पाइन रस्त्याच्या दुतर्फा, पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते पांजरपोळ दरम्यान मोहीम राबवली. यात प्रतिष्ठानच्या अकराशे स्वयंसेवकांसह महापालिका सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहायक आरोग्याधिकारी तानाजी दाते, आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजीनवाल, क्षितीज रोकडे, संजय मानमोडे, वैभव घोळवे सहभागी झाले होते.