Sun, March 26, 2023

शिष्यवृत्ती परीक्षेत
जान्हवी सोलकर प्रथम
शिष्यवृत्ती परीक्षेत जान्हवी सोलकर प्रथम
Published on : 2 March 2023, 9:56 am
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २ ः ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, त्यादृष्टीने शाळांच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारावा आणि स्पर्धा परीक्षांसाठी त्यांची पूर्वतयारी होण्यासाठी येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाने पहिल्यांदाच हाती घेतलेल्या गुणवत्ता सुधार प्रकल्पातील समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षेत जान्हवी सोलकर हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शुभम माळी आणि शरण्या हुलावळे यांना अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळाले आहेत. संस्था सचिव संतोष खांडगे यांनी गुरुवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी प्रकल्प प्रमुख एस. एन. गोपाळे उपस्थित होते.