तलावांचे खोलीकरण आणि सुशोभिकरण करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलावांचे खोलीकरण आणि
सुशोभिकरण करण्याची मागणी
तलावांचे खोलीकरण आणि सुशोभिकरण करण्याची मागणी

तलावांचे खोलीकरण आणि सुशोभिकरण करण्याची मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ ः शहरातील सार्वजनिक तलावांचे खोलीकरण आणि पुनरुज्जीवन करावे. त्याद्वारे पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक जलस्त्रोतांचे जतन करावे, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासक शेखर सिंह यांना दिल्या.
आमदार लांडगे यांनी सिंह यांना दिलेलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील तलावांची दुरवस्था झाली आहे. गाळ साचला आहे. गवत व जलपर्णींचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी कचरा आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राधिकरणातील गणेश तलाव, चिखली, भोसरी आणि बर्ड व्हॅली येथील तलावांची अवस्था दयनीय आहे. नियमित स्वच्छता होत नाही. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढले असून तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. शहरातील तलाव हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. त्याकरिता तलावांमधील गाळ काढून खोलीकरण करावे. पुनरुज्जीवन करून सुशोभीकरण करावे. त्यामुळे पर्यावरण संधर्वन आणि नैसर्गिक जलस्त्रोत पुनरुज्जीवन करतानाच शहराच्या सौंदर्यात भर घालल्याच्या हेतूने तलाव सुधार प्रकल्प हाती घेणे संयुक्तिक ठरणार आहे. यावर सकारात्मक भूमिकेतून कार्यवाही करावी.