व्याख्यान, आरोग्य शिबिर, स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्याख्यान, आरोग्य शिबिर, स्पर्धा
व्याख्यान, आरोग्य शिबिर, स्पर्धा

व्याख्यान, आरोग्य शिबिर, स्पर्धा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ ः शहरात विविध संस्था, संघटनांनी तसेच शाळा-महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

जयवंत विद्यालय
भोईरनगर जयवंत माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक अजय रावत यांनी सावित्रीबाई फुले प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय नारी वर कविता व भाषणे केली. ‘महिला सक्षमीकरणावर’ आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांना फळे व चॉकलेटचे वाटप केले. सूत्रसंचालन राजेश पाटील यांनी केले. आभार धनराज गुटाळ यांनी मानले.

ताराबाई कन्या प्रशाला
सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेमध्ये सुरुवात सरस्वती पूजन, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, जिजामाता, झाशीची राणी, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व नवकार महामंत्राने केली. प्रशालेच्या प्राचार्या सारंगा भारती, विभागप्रमुख हंसा लोहार, सुषमा बंब, शिक्षकप्रतिनिधी उज्वला कोळपकर, स्वाती नेवाळे उपस्थित होते. प्रास्ताविक आर. कुत्तरवाडे यांनी केले. एच. टी. शिंदे यांनी स्त्रीवरील कविता सादर केली. शिक्षक प्रतिनिधी एस. डी. नेवाळे यांनी माहिती दिली. शिक्षकांसाठी मनोरंजक खेळ घेण्यात आले. सूत्रसंचालन एस. पी. बनसोडे यांनी केले. डी. एस. थोरात यांनी आभार मानले.

सरस्वती माध्यमिक विद्यालय
निगडी-सिंधुनगर येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व इम्पोवर्ड वूमन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचा कार्यक्रम साजरा केला. प्रा. गोविंदराव दाभाडे, नगरसेवक समीर जवळकर, इम्पोवर्ड वूमन्स असोसिएशनच्या शारदा आगरवाल, प्रसिद्ध कवयित्री, लेखिका समृद्धी सुर्वे, तेजस्विनी कदम (निगडी पोलिस स्टेशन), विद्यालयाच्या प्राचार्या साधना दातीर, उप-प्राचार्य विजय बच्चे, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे, पर्यवेक्षिका कोकिळा आहेर उपस्थित होते. प्रास्ताविक संगीता भोळे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा वाळुंज यांनी केले. आभार सरिता खेनट यांनी मानले.

यशस्वी प्राथमिक विद्यालय
यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यालयाचे अध्यक्ष सुभाष देवकाते, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते, संस्थेचे सचिव डॉ. तुषार देवकाते उपस्थित होते. माता पालकांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आले. ‘आनंदीबाई जोशी’ यांच्यावर नाटिका कोमल पुंडकर, गायत्री हरणे, अनम शेख, श्रावणी बेंद्रे, नंदिनी बोऱ्हाडे, सानिका शेख या विद्यार्थिनींनी सादर केले. विद्यालयातील अलिशा शेख, पायल सोळुंखे, गौरी तुपारे या विद्यार्थिनींनी मनोगत केले. विज्ञान प्रदर्शनात बाल वैज्ञानिकांनी प्रात्यक्षिके सादर केली.

कामगार कल्याण मंडळ
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कल्याण केंद्र चिंचवड येथे महिलांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात प्रकाश चव्हाण, संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड, सहाय्यक कल्याण आयुक्त समाधान भोसले उपस्थित होते. डॉ. मृणाल फोंडेकर, डॉ. नीरज पाटील, डॉ. पूजा जगताप यांनी तपासणी केली. सूत्रसंचालन प्रदिप बोरसे यांनी केले. आभार अश्विनी दहितुले यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन माया कदम ,प्रिया पुजारी,भास्कर मुंडे सतीश चव्हाण यांनी केले.

एम. एम. विद्यामंदिर
एम. एम. विद्यामंदिर काळेवाडी या शाळेत महिला दिन नववी ब व क च्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी आयोजित केला. सूत्रसंचालन व प्रास्ताविक नववीच्या विद्यार्थ्यांनी केले. शाळेला महिला शिक्षकांची फोटो फ्रेम भेट देण्यात आले. मुख्याध्यापिका व्ही. एस. वाल्हेकर, विद्यालयातील शिक्षिका पी. एम. जटे, पी. डी. चव्हाण, देवकर यांनी महिला दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.

महिला पालकांसाठी विविध स्पर्धां

चिंचवड येथील गीता मंदिर प्राथमिक शाळेत महिला पालकांच्या विविध स्पर्धां घेण्यात आले. मुख्याध्यापक महेंद्र भोसले यांनी राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. प्रीती साठे, सारिका काळे, अश्विनी गरड, रमा कांबळे या पालकांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांचे व सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले. आकर्षक साड्या विजेत्यांना बक्षीस म्हणून देण्यात आल्या. संयोजन ज्योत्स्ना वाव्हळ यांनी केले. संगीता शहासने, चंदा नामदे ,मंदा कोकरे, राजश्री गायकवाड, सुनीता धोंडगे उपस्थित केले.

गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल
श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमध्ये संध्या अडागळे, प्राची गुंजाळ, हर्षदा लष्करे, आरती खताळ, हर्षदा बनसोडे, भूमिका जावळे, रेवा शिंदे यांनी विविध कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. प्राचार्य विक्रम काळे, पर्यवेक्षक शशिकांत हुले उपस्थित होते. अनम विजापुरे, अल्सबा इनामदार, विजया सूर्यवंशी, दीक्षा पेटाडे या विद्यार्थिनींनी व शिक्षक मनोगतामध्ये विठ्ठल शेवाळे व सुनीता शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केले. प्रास्ताविक पर्यवेक्षक शशिकांत हुले यांनी केले. सूत्रसंचालन रामनाथ खेडकर यांनी केले तर आभार शिक्षक प्रतिनिधी गजानन हरिदास यांनी मानले.

लोकहितवादी सेवा
काळेवाडी येथे लोकहितवादी सेवा संघाच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने परिसरातील महिलांसाठी मुलांच्या सर्वांगीण विकास कसा करावा, या विषयावरती मोफत कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत शैक्षणिक आणि करिअर मार्गदर्शक संदीप मोरे आणि कायदेविषयक सल्लागार ॲड. अजित बोराडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष रोहित चांदणे, चिंचवड शाखा अध्यक्ष प्रीतम काळे, रावेत शाखा अध्यक्ष अजय कांबळे, दत्तात्रेय वानखेडे, राजेश दास व संतोष दिवे उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष धर्मराज बनसोडे व उपाध्यक्ष गणेश भोंडवे यांनी संयोजन केले.

पुण्यश्लोक फाउंडेशनचा उपक्रम
पुण्यश्लोक फाउंडेशनच्यावतीने जुन्नर तालुक्यातील मांदरणे गावच्या शिवारात असलेल्या मेंढपाळाच्या वाड्यावर महिला दिन साजरा केला. संस्थेचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी यावेळी उपस्थित महिलांना सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली तर पृथ्वी अर्जुने यांनी महिलांनी आरोग्याची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. संजूबाई कोळेकर, दयनाबाई करे, संजाबाई करे, मळूबाई ठोंबरे, अंजाबाई ठोंबरे, सोनाबाई कोकरे, तुळसाबाई सतीश घुले, सरूबाई घुले, बायडाबाई करे, आकाबाई करे, जिजाबाई रमेश कोळेकर, बायडाबाई काळुराम घुले, अर्चना गजानन कोकरे, आदि महिलांचा अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. पांडुरंग कोळेकर, पुण्यश्लोक फाउंडेशनच्या संचालिका दीप्ती तानले व रुक्मिणी धर्म, सुप्रिया परदेशी, मोहन करे, गजानन कोकरे, मळीबा करे उपस्थित होत्या.