Sun, March 26, 2023

आढले खुर्द ग्रामपंचायतीच्या
उपसरपंच पदी पप्पूशेठ चांदेकर
आढले खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी पप्पूशेठ चांदेकर
Published on : 9 March 2023, 11:16 am
सोमाटणे, ता. ९ ः आढले खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी पप्पूशेठ चांदेकर यांची बिनविरोध निवड झाली. ठरल्याप्रमाणे उपसरपंच चैत्राली पशाले यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. सरपंच नंदा भालेसाईन यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी पप्पूशेठ चांदेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पुनम जमदाडे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी सदस्य योगेश भोईर, चैत्राली पशाले, मंदा घोटकुले, मंगेश येवले, सोनल जगदाळे उपस्थित होते. चांदेकर यांचा सत्कार खरेदी विक्री संघाचे चेअरमन दत्ता केदारी यांच्या हस्ते माजी सरपंच दत्तोबा चांदेकर, भाऊसाहेब भोईर, बाबूराव येवले, महेंद्र भोईर, आदींच्या उपस्थित करण्यात आला.