मोरवाडीत महिलांसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरवाडीत महिलांसाठी
प्रश्नमंजूषा स्पर्धा
मोरवाडीत महिलांसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा

मोरवाडीत महिलांसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा

sakal_logo
By

पिंपरी ः मोरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने महिलांसाठी प्रश्नमंजूषा घेण्यात आली. हा खेळ सिंधूताई खंडागळे यांनी घेतला. दुसरा खेळ महिलांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित गोष्टींवर आधारित प्रज्ञा माडगुळकर यांनी घेतला. प्रमुख अतिथी मानसी वाघेरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. अनुराधा सोमण यांनी जीवनातील संघर्षावर चर्चा केली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यवाह यशवंत आपटे, कोषाध्यक्ष अरविंद देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष बी. आर. माडगुळकर उपस्थित होते.

इलेक्ट्रॉनिक व्हायब्रेटर मशिन भेट
पिंपरी ः जागतिक महिला दिन आकुर्डीस्थित डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी पुरुष प्राध्यापकांच्या मदतीने महाविद्यालयाला इलेक्ट्रॉनिक व्हायब्रेटर मशिन भेट दिली. या मशिनच्या शास्त्रीय वापराने कमीत कमी वेळात शरीराला विविध प्रकारच्या व्यायामाचे फायदे मिळतात. याशिवाय कार्यालयीन वेळेदरम्यान सुमारे दहा मिनिटांचा वापर सुद्धा आरोग्यासाठी गुणकारी असल्याने महिलांना त्याचा विशेष फायदा होणार आहे. यावेळी प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांनी ‘महिला आरोग्य’ याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. मुकेश मोहिते व प्रा. वैभव वैद्य यांनी विविध मनोरंजनपर स्पर्धेचे आयोजन केले. उपप्राचार्या डॉ. शिल्पा चौधरी यांनी आभार मानले

विजेत्यांना आकर्षक बक्षीसे
चिंचवड ः भोईरनगर येथील जयवंत प्राथमिक शाळेतील महिला पालकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शिल्पा कुलकर्णी (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका) व संगीता रणवरे (अक्षर स्पर्श अक्षर-लेखन प्रकल्प), मुख्याध्यापिका वंदना सावंत आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीसे देण्यात आले. विद्यार्थिनींनी आई ही कविता व नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे संयोजन वंदना कोरपे यांनी केले.

महिलांसाठी विविध स्पर्धा
कासारवाडी ः येथील द्वारिका नगरी हाउसिंग सोसायटी ‘बी विंग’ मध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये लिंबू चमचा, लांब उडी, गायन स्पर्धा, संगीत खुर्ची व १०० मीटर धावण्याची स्पर्धा आदींचे आयोजन केले होते. त्यामधील विजेत्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. बिल्डिंगमधील सर्व महिला तसेच बालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. पिंपरी चिंचवड मनपा ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कारप्राप्त निवृत्त शिक्षिका रत्नमाला चंद्रकांत जोगदंडे यांचे ‘महिलांसाठी भविष्यातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले.