आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी‎ पाच दिवसांत १६२२ अर्ज‎ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी‎ 
पाच दिवसांत १६२२ अर्ज‎
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी‎ पाच दिवसांत १६२२ अर्ज‎

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी‎ पाच दिवसांत १६२२ अर्ज‎

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः आरटीई खासगी शाळांमध्ये ‎प्रवेशासाठी दहा दिवसांत पालकांकडून एक हजार‎ ६२२ अर्ज करण्यात आले. प्रवेशासाठी‎ ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेचा श्रीगणेशा‎ झाला असून, १७ मार्चला रात्री बारापर्यंत‎ अर्ज करता येणार आहे.‎
शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश दिले जातात. अर्जांची ऑनलाइन प्रक्रिया एक मार्चपासून सुरू झाली आहे. या प्रक्रियेत पाल्यांनी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करून नोंदणी करणे आवश्‍यक आहे. दरम्यान, आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत परिपूर्ण अर्ज करावा, पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी दहा शाळांची निवड करावी, अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पालकांसाठी मदत केंद्राची स्थापना केली आहे. मात्र, सलग दोन दिवसांपासून ‘आरटीई’चे सर्व्हर डाउन झाल्यामुळे पालकांना अर्ज भरण्यास असंख्य अडचणींचा सामना करावा लागला होता.
‎आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी शाळांच्या‎ नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र‎, प्रारंभी या नोंदणी प्रक्रियेकडे काही‎ व्यवस्थापनातील शाळांनी फारसे लक्ष दिले‎ नाही. पाठपुरावा केल्यानंतर नोंदणी प्रक्रियेला‎ वेग आला. नोंदणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत‎ १७२ शाळांनी नोंदणी केली. संबंधित‎ शाळांमधील चार हजार तीनशे जागा‎ आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या‎ वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव‎ ठेवल्या आहेत.‎

...तर पुन्हा प्रयत्न करा‎
आरटीईअंतर्गत ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी‎ पालकांकडून प्रतिसाद मिळत आहे. अर्ज‎ करण्याची गती वाढतच असून, सर्व्हरच्या‎ क्षमतेपलीकडे जाऊन संकेतस्थळ बंद पडत आहे. वारंवार सर्व्हर हॅंग होत आहे. त्यामुळे पालकांनी संभ्रमात‎ न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा,‎ असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.