निगडीत पेन्शनधारकांचा बुधवारी ‘रास्ता रोको’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निगडीत पेन्शनधारकांचा
बुधवारी ‘रास्ता रोको’
निगडीत पेन्शनधारकांचा बुधवारी ‘रास्ता रोको’

निगडीत पेन्शनधारकांचा बुधवारी ‘रास्ता रोको’

sakal_logo
By

पिंपरी, ता.११ ः ईपीएस राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने पेन्शनधारकांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता. १५) रोजी निगडी येथील भक्ती शक्ती उद्यान चौकात बुधवारी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत व पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेन्शनधारकांच्या विविध मागण्या मान्य होण्यासाठी संपूर्ण देशपातळीवर १५ मार्चला सकाळी ११ वाजता एकाच वेळी महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
रास्ता रोको आंदोलनात हजारो पेन्शनर रस्त्यावर उतरून सरकारने विविध मागण्या मान्य करून पेन्शनधारकांना न्याय द्यावा, यासाठी सरकारचे लक्ष वेधणार आहेत. राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने चिंचवड येथील जिजाऊ उद्यानात पेन्शनधारकांची सभा झाली. यावेळी ‘अभी नहीं तो कभी नहीं’ नारा देण्यात आला. आंदोलनाच्या नियोजनाची माहिती देण्यात आली. राष्ट्रीय संघर्ष समितीचे शहराध्यक्ष इंद्रसिंग राजपूत, सल्लागार विजय राज पाठक, उपाध्यक्ष तानाजी काळभोर, कार्याध्यक्ष विजय जगताप आदी उपस्थित होते.