Sat, April 1, 2023

विचार प्रबोधनपर्व नियोजनासाठी आज पालिकेत बैठक
विचार प्रबोधनपर्व नियोजनासाठी आज पालिकेत बैठक
Published on : 12 March 2023, 1:51 am
पिंपरी ः महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन करण्यात येणार आहे. यांच्या नियोजनासाठी सोमवारी (ता.१३) आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता ‘दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहा’त बैठक होणार आहे. यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.