टिळक गुलाब पुष्प उद्यानाचा गौरव फुले-फळे -भाजीपाला बागा, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टिळक गुलाब पुष्प उद्यानाचा गौरव
फुले-फळे -भाजीपाला बागा, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन
टिळक गुलाब पुष्प उद्यानाचा गौरव फुले-फळे -भाजीपाला बागा, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन

टिळक गुलाब पुष्प उद्यानाचा गौरव फुले-फळे -भाजीपाला बागा, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ ः महापालिका, वृक्ष प्राधिकरणाच्यावतीने २६ वे फुले-फळे -भाजीपाला बागा, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शन भरविण्यात आले होते. या वृक्षारोपण स्पर्धेत जयवंतराव टिळक गुलाब पुष्प उद्यान सहकारनगर, पुणे यांच्या (फुलांचा राजा, अल्फा लावल चषक) फिक्कट गुलाबी रंगाच्या गुलाबाला तर (फुलांची राणी, खिंवसरा चषक) लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलाला प्राप्त झालेला आहे.

या स्पर्धेमध्ये ८ प्रकारात एकूण १५६५ प्रवेशिकाद्वारे स्पर्धकांनी भाग घेतला आहे. स्पर्धेचे उदघाटन प्रशासक शेखर सिंह, आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह शहर अभियंता मनोज सेठीया, बाबासाहेब गलबले, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, उप आयुक्त सुभाष इंगळे, रवीकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, उद्यान अधीक्षक गोरख गोसावी आदी अधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यामध्ये बागा व वृक्षारोपणाच्या स्पर्धा दिनांक १ ते ५ मार्च २०२३ अखेर या कालावधीत घेण्यात आल्या. या स्पर्धेत ११५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्याचा बक्षिस वितरण समांरभ १० मार्चला झाला आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यामध्ये शोभिवंत पाना-फुलांच्या कुंड्या, गुलाब पुष्प, हंगामी फुले, पुष्पपात्र सजावट फळे-फुले, भाजीपाला आदी स्पर्धा १० ते
१२ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे उद्याने व उपवने, रोझ सोसायटी पुणे, भारती वनस्पती सर्वे संस्था पुणे, वनविकास महामंडळ पुणे, टाटा मोटर्स, दादाभाऊ पवार (निवृत्त उद्यान अधीक्षक, महाराष्ट्र शासन) तुकाराम नाणेकर, (पॉलीहाऊस तज्ज्ञ) यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेत खाजगी बाग शौकिनांच्या मर्यादीत गटात जास्तीत जास्त बक्षिसे प्रथम ५, द्वितीय १२, तृतीय १४ अशी एकूण ३१ बक्षिसे खडकीतील संजय मेहता यांना मिळाल्यामुळे ‘आयुक्त चषक’ तर खुल्या गटात जास्तीत जास्त प्रथम १४, द्वितीय १९, तृतीय २४ अशी एकूण ५७ बक्षिसे लांडेवाडी भोसरीतील ‘लक्ष्मीफ्लॉवर अँन्ड डेकोरेशन’चे भारत दिलीप भुजबळ यांना मिळाल्यामुळे ‘महापौर चषक’ प्राप्त झाला आहे. तसेच विविध गटामध्ये ३४ स्पर्धकांनी बक्षिसे मिळाल्याने आकर्षक ट्रॉफी देण्यात आल्या.
30549