दोन लाख वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन लाख वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट
दोन लाख वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट

दोन लाख वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ : शहराच्या ‘ग्रीन कव्हर’ (हरित पट्टा) मध्ये वाढ होण्यासाठी या आर्थिक वर्षात दोन लाख वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर घनवन निर्माण करण्यासाठी ‘मियावाकी’ पद्धतीने २०२३-२०२४ या वर्षात एक लाख वृक्षांची लागवड सुरू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी दिली.

उद्यान विभाग
- भक्ती-शक्ती ते किवळे, चऱ्होली परिसर, डांगे चौक ते साई चौक या भागातील रस्ते एकाच पद्धतीचे वृक्ष लागवड करणार
- ‘ग्रीन कव्हर’मध्ये वाढ होण्यासाठी शहरात दोन लाख वक्षारोपण करणार
- दिघी गायरान येथे जापनीज ‘मियावाकी’ पद्धतीने एक लाख वृक्षांची लागवड करणार
- महापालिकेच्या मालकीच्या उद्याने खासगी भागीदारी पद्धतीने चालविण्यास देणार
- तळवडे येथे आठ एकरांवर जैवविविधता उद्यानाचे उर्वरित क्षेत्र या वर्षामध्ये पूर्ण करणार
- दुर्गादेवी टेकडी उद्यानाचे अद्ययावत पद्धतीने विकास करून देशी संगोपन व प्रसार करणार

विद्युत विभाग
- ‘इव्ही’ सज्ज शहर होण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून शहरात २२ इव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार
- अधिकाऱ्यांनी ‘इव्ही’ वाहने वापरण्यासाठी प्रोत्साहन, महापालिका आवारात चार्जिंग स्टेशन स्थापित करणार
- चऱ्होली, निगडी, हिंजवडीत इलेक्ट्रीक बससाठी चार्जिंग स्टेशनसाठी वीजपुरवठा देण्याचे काम अंतिम टप्प्यात
- महापालिका क्षेत्रातील इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प राबविणार, महापालिकेची तीन कोटी ५२ लाखांची वीज बचत होणार
- महापालिकेच्या विविध उड्डाणपुलावर रंगीत प्रकाश व्यवस्था करून सुशोभीकरण

अग्निशमन विभाग
- पिंपरीत मध्यवर्ती अग्निशमन व आणीबाणी नियंत्रण कक्ष तथा मुख्यालय व अग्निशमन प्रशिक्षण केंद्र उभारणार
- अग्निशमन प्रशासकीय इमारत, वाहन दुरुस्ती कार्यशाळा, स्वतंत्र ट्रेनिंग सेंटर, ड्रिल टॉवर उभारणार
- आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र व नियंत्रण कक्ष, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ३२० निवासस्थाने उभारणार
- चोविसावाडी- चऱ्होली, पुनावळे, भोसरी एमआयडीसी, दिघी या भागात चार अग्निशमन केंद्र
- अत्याधुनिक साधनसामुग्री असलेली १३ वाहने खरेदी करणार
- अग्निशमन विभागाच्या कामकाजासाठी ८६ प्रकारचे अत्याधुनिक अग्निशमन व विमोचन साहित्य व उपकरणे खरेदी करणार
- अग्निशमन सेवेस अत्याधुनिक सेवा पुरविण्यासाठी ‘आयटी एनेबल फायर रिस्पॉन्स सिस्टिम’ची कार्यवाही प्रस्तावित
- शहरात विविध प्रकारचे धोके, आपत्ती ओळखण्यासाठी महापालिका क्षेत्राचे त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यांकन करण्यात येणार