
‘आसवानी क्रिकेट कप’ चे दुसरे पर्व लवकरच
पिंपरी, ता. १५ : ‘आसवानी क्रिकेट कप’ क्रिकेट स्पर्धेचे दुसरे पर्व २९ एप्रिल २०२३ पासून सुरु होणार आहे. पिंपरी-चिंचवड येथील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर ही क्रिकेट स्पर्धा २२ दिवस चालणार आहे. या स्पर्धेत एकूण १४ संघ खेळणार आहेत. टी-१० स्वरूपात हे सामने होणार आहेत. ‘ये है पिंपरी का त्योहार’ ही टॅगलाईन घेऊन हा क्रीडा महोत्सव होत आहे. अशी माहिती स्पर्धेचे प्रमुख संयोजक श्रीचंद आसवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सहभागी १४ संघ ः
पिंपरी इंडियन्स , रत्नानी नाईट रायडर्स , मंगतानी टायटन्स , तिल्वानी चार्जर्स, फ्रेंड्स वॉरिअर्स , रॉयल चॅलेंजर्स वरुण, केसवानी किंग्ज इलेव्हन, वाधवानी सनरायझर्स, मोटवानी रॉयल्स, आसवानी डेअरडेविल्स, संत कंवरम लायन्स, देव टस्कर्स, डायमंड सुपरकिंग्ज आणि रामचंदानी सुपरजायंट्स या १४ संघांचा स्पर्धेत समावेश आहे.
बक्षिसांची बरसात
विजेत्या संघाला ५,५५,५५५/-, तर उपविजेत्या संघाला ३,३३,३३३/- रुपयांचे रोख पारितोषिक व करंडक दिला जाणार आहे. यासह ‘मॅन ऑफ द’ सिरीजसाठी चेतक स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर, हॅट्रिक विकेटसाठी १,०१,०००/-, हॅट्रिक सिक्सेससाठी ५१,०००/-, प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचसाठी १०,०००/-, प्रत्येक सिक्ससाठी १०००/-, प्रत्येक चौकारासाठी ५००/- रुपये बक्षीस दिले जाणार आहे.