‘रिंगरोड मोबादाला बाजारभावाच्या पाचपट द्यावा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रिंगरोड मोबादाला बाजारभावाच्या पाचपट द्यावा’
‘रिंगरोड मोबादाला बाजारभावाच्या पाचपट द्यावा’

‘रिंगरोड मोबादाला बाजारभावाच्या पाचपट द्यावा’

sakal_logo
By

सोमाटणे, ता. १६ ः पुणे महानगर प्राधिकरणाअंतर्गत मावळातील पाचाणे, चांदखेड, उर्से, बेबडओहोळ, परंदवडी गावाच्या हद्दीतून प्रस्तावित रिंगरोड जात आहे. या रिंगरोडच्या मोजणीवेळी संबंधित विभागाने सन १९३१ च्या भूसंपादन कायद्यानुसार बाजारभावाच्या पाचपट मोबदला दिला जाईल असे आश्वासन दिले होते. सध्या रिंगरोड मोजणी व जमीन संपादनाचे काम अंतिम टप्यात आले आहे. तरी देखील संबंधित विभागाकडून जमिनीचा निश्चित दर सांगितला जात नसल्याचे रिंगरोड शेतकरी कृती समितीचे म्हणणे आहे. आश्वासनाप्रमाणे सध्याच्या बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी रिंगरोड कृती समितीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनव्दारे केली आहे.

गेल्या काही दिवसात पाचाणे, चांदखेड, उर्से, बेबडओहोळ, परंदवडी या गावाच्या हद्दीतील बहुसंख्य शेतीचे क्षेत्र रहिवासी, औद्योगिक किंवा व्यावसायिक झोनमध्ये रुपांतरीत झाल्याने जमिनीच्या किमती वाढल्या आहेत. सध्या किमती किमान एकरी एक कोटीच्या पुढे गेल्या आहेत. संबंधित विभागाने या किमतीची खात्री करावी. व या किमती आधारभूत धरुन त्याच्या पाचपट मोबदला द्यावा अशी मागणी रिंगरोड शेतकरी कृती समितीने निवेदनाव्दारे यांनी केली आहे. मागणी रास्त असल्याने मागण्यांचा विचार केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष मनोज येवले, सचिव दीपक जाधव, अशोक गायकवाड, संतोष पापळ, बाळासाहेब वाल्हेकर, संदीप येवले, दत्तात्रेय गायकवाड, रवींद्र घारे, अॅड. दिलीप ढमाले आदींसह कृती समितीचे पदाधिकारी व प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.