
आयटीआय विद्यार्थ्यांसाठी आज करिअर कार्यशाळा
पिंपरी, ता. १५ ः महापालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणाच्या (डिप्लोमा, डिग्री) घेता याव्यात. त्यांना रोजगाराच्या संधी मुबलक प्रमाणात प्राप्त होतील. उच्च शिक्षणाबाबत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. विसा, इंग्रजी संभाषण आदींचे शुल्क महापालिका धोरणाच्या माध्यमातून देण्यात येईल. या विद्यार्थ्यांना परदेशातील अनेक विद्यापीठे, कॉलेज, इन्स्टिट्यूट्स आणि ट्रेनिंग संस्थांमध्ये संधी उपलब्ध आहेत. परदेशात त्यांना इंटर्नशिप व नोकरीच्या संधी मिळतील. या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी विद्यार्थी व पालकांसाठी चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात गुरुवारी (ता. १६) दुपारी दोन ते साडेपाच या वेळेत ग्राड ड्रीम्स अर्थसेतू संस्थेच्या माध्यमातून कार्यशाळा आयोजित केली आहे, असे आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी कळविले आहे.
--