मियावाकी पद्धतीने श्रमदानातून वृक्ष लागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मियावाकी पद्धतीने 
श्रमदानातून वृक्ष लागवड
मियावाकी पद्धतीने श्रमदानातून वृक्ष लागवड

मियावाकी पद्धतीने श्रमदानातून वृक्ष लागवड

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १९ : माझी वसुंधरा अभियानांतर्गत मियावाकी पद्धतीने श्रमदानातून शनिवारी वृक्षलागवड करण्यात आली. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत भूमी या घटकाच्या माध्यमातून शहरातील स्टेशन तळे परिसरात मियावाकी पद्धतीने श्रमदानातून वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत वड, पिंपळ, ताम्हण, सोनचाफा, बकुळ, स्पॅथोडिया या प्रजातींच्या ५२० वृक्षांची लागवड करण्यात आली. नगर परिषदेमार्फत महेश महाजन, अभय केवट, ऋषिकेश कुलकर्णी, मयुरेश राजगुरव यांना मानपत्र देऊन पर्यावरण दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या वृक्ष लागवड उपक्रमाचे नियोजन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे व उद्यान निरीक्षक सिद्धेश्वर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.