‘पालिका’ संपाबाबत आज मुंबईत बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पालिका’ संपाबाबत
आज मुंबईत बैठक
‘पालिका’ संपाबाबत आज मुंबईत बैठक

‘पालिका’ संपाबाबत आज मुंबईत बैठक

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ ः जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यांना राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचारी संघटना फेडरेशनने पाठिंबा दिला आहे. मात्र, या स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे आरोग्य, वैद्यकीय, पाणीपुरवठा, विद्युत, अग्निशामन अशा अत्यावश्यक सेवा पुरवल्या जातात. त्यामुळे अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेडरेशनला केले होते. त्यानुसार, गुरुवारपासून सर्व कर्मचारी कामावर हजर झाले असून काळ्या फिती लावून काम करत आहेत. मात्र, मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. २०) दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी दिली.
--