
मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक यशस्वी ः झिंजुर्डे
पिंपरी, ता. २० ः राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य महापालिका- नगरपालिका- नगरपरिषद कामगार- कर्मचारी संघटना फेडरेशनने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर २५ मागण्या सरकारकडे केल्या होत्या. त्यासाठी मंगळवारपासून (ता. १४) संप पुकारला होता. महापालिका कर्मचारी गुरुवारपासून काळ्या फिती लावून कामावर हजर होते. मात्र, संपास पाठिंबा होता. या पार्श्वभूमीवर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत सोमवारी (ता. २०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. त्यात जुन्या पेन्शनसह उर्वरित २५ मागण्यांवरही अतिशय सकारात्मक चर्चा झाल्याने संप मागे घेतल्याचे फेडरेशनचे तथा पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी सांगितले. बैठकीस पदाधिकारी संजय केणेकर, अशोक जाधव, गणेश शिंगे, गौतम खरात, अशोक जानराव, डॉ. डी. एल. कराड, सुनील वाळुंजकर, संतोष पवार, रामगोपाल मिश्रा आदी उपस्थित होते.
--