Wed, June 7, 2023

वर्गणीसाठी जबरदस्ती वसूली नको
वर्गणीसाठी जबरदस्ती वसूली नको
Published on : 22 March 2023, 9:01 am
गावोगावचे उरुस, जत्रा, गणेशोत्सव व उत्साहाने होतात. त्यासाठी घरटी वर्गणी घेतली जाते. कुणाला बळजबरी नाही की, कुणालाही जबरदस्ती नसे. ऐच्छिक वर्गणी असल्याने सर्व जण आपापल्या स्वच्छेने उत्सवाला आर्थिक मदत देऊन सहभाग नोंदवत. काही रक्कम शिल्लकच राहिल्यास अहवाल गावकऱ्यांना वाचायला मिळत. परंतु, हल्ली दहा-पंधरा वर्षात कार्यकर्ते फक्त रक्कम लिहून पावती देऊन जातात. पावतीवर धर्मादाय आयुक्तांचा नोंदणी क्रमांक नसतो. किंवा सरकारी परवानगीचा दाखला नसतो. दोन अडीच वर्षे कोरोनामध्ये गेल्याने सर्वजण आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. हजारो रुपयांच्या पावत्या फाडून घरात, दुकानात, आणि ऑफिसमधून वसुली केली जाते. सण-उत्सव साजरे व्हावेतच परंतु सक्ती नसावी. ही सामान्य नागरिकांची भावना आहे.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे