बारावीची परीक्षा अखेर संपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारावीची परीक्षा अखेर संपली
बारावीची परीक्षा अखेर संपली

बारावीची परीक्षा अखेर संपली

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येत असलेली बारावीची परीक्षा संपली. शेवटचा पेपर संपल्याने विद्यार्थ्यांनी आनंद केला. परीक्षा झाल्‍यानंतर आता निकाल कधी लागणार, अशी चर्चा रंगली होती. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या दरम्यान झाली. शहरातून १७ हजार ५ विद्यार्थी परीक्षार्थी होते. २१ फेब्रुवारीपासून सुरू झालेली परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीने जल्लोष केला. पेपर सुटल्यानंतर शाळांच्या बाहेर विद्यार्थी गप्पा मारण्यात दंग झाले होते. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मित्र-मैत्रिणीसोबत आवडत्या खाद्य पदार्थावर ताव मारण्याची संधी साधल्याचे पहायला मिळाले. सुटीमध्ये कुठे आणि काय करणार असल्याचे प्लॅनिंग विद्यार्थी करत होते. त्याची अंमलबजावणी करण्याचे वेधही विद्यार्थ्यांना लागल्याचे पहायला मिळाले.