Wed, June 7, 2023

संतनगरमध्ये श्री स्वामी समर्थ सोहळा उत्साहात
संतनगरमध्ये श्री स्वामी समर्थ सोहळा उत्साहात
Published on : 24 March 2023, 9:12 am
पिंपरी, ता. २४ : संत नगर मोशी प्राधिकरण सेक्टर चार येथील संघर्ष संस्था व श्री स्वामी समर्थ सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्यानिमित्त गुरुवार (ता.२३) धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक पंकज शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा पार पडला. सकाळी आठ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांचा रुद्र अभिषेक झाला. त्यानंतर सांप्रदायिक भजन, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जन्म पाळणा व महाराजांच्या पादुका परिक्रमा पालखी सोहळा झाला. तसेच दिवसभर भव्य रक्तदान शिबिर झाले. संत नगर परिसरामध्ये या पालखीची मिरवणूक झाली. सायंकाळी श्रींची आरती व महाप्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.