श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात गर्दी
श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात गर्दी

श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात गर्दी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ : श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन शहरात उत्साहात साजरा झाला. यानिमित्त ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
चिंचवडमधील श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाने लिंकरोडवरील बुकाऊ वुल्फ कॉलनी पटांगण येथे पाच दिवस धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे. गुरुवारी (ता. २३) प्रकट दिनानिमित्त पहाटे साडे चार वाजता श्रीं ना धन्वंतरी अभिषेक व पूजा, सहा ते सात यावेळेत भक्तांमार्फत लक्षावधी गायत्री जप, साडे सातला आरती, आठ वाजता सामूहिक रुद्र अभिषेक, दुपारी बारा वाजता महानैवेद्य व आरती, साड़े बारानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी साडे पाचला आरती झाली. तसेच ग्रंथदिंडी, रक्तदान नेत्र चिकित्सा शिबिर या उपक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत.
तसेच चिखली प्राधिकरणातील राजे शिवाजीनगर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) यांच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्त श्री स्वामी समर्थांची ग्राम अभियान रथ पालखी मिरवणूक काढण्यात आली. तसेच प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. सकाळी आठला भूपाळी आरती, साडे आठला महाराजांच्या मूर्तीवर षोडशोपचार अभिषेक, साडे नऊला श्री स्वामी समर्थ जप, अकरा वाजता सामुदायिक स्वामी चरित्र सारामृत पारायण, सायंकाळी पाच ते सहा बालसंस्कार मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, साडे शाळा नैवेद्य आरती व मार्गदर्शन तर सायंकाळी सात ते दहा वेळेत महाप्रसाद करण्यात आला.
यासह शहरातील इतर मंदिरांमध्येही विविध कार्यक्रम आयोजित केले होते. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरांना रोषणाईसह फुलांची आकर्षक सजावट केली होती. स्वामींचा जप तसेच भक्तिगीतांनी परिसरातील वातावरण प्रसन्न झाले होते.