Wed, June 7, 2023

शहीद दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन
शहीद दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन
Published on : 23 March 2023, 2:09 am
पिंपरी, ता. २३ ः थोर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव शहीद दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापालिकेत आणि भगतसिंग यांच्या दापोडी येथील पुतळ्यास महापालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, वामन नेमाणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, उमेश बांदल आदी उपस्थित होते. जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.