Tue, June 6, 2023

बोपोडीती चिमुकल्या नातीचे मिरवणुकीने स्वागत
बोपोडीती चिमुकल्या नातीचे मिरवणुकीने स्वागत
Published on : 24 March 2023, 11:58 am
पिंपरी, ता.२४ ः मुलगी जन्मास आली म्हणून नाराज होण्याचा काळ झपाट्याने कमी झाला आहे. ‘मेरे घर आयी, एक नन्ही परी’ असे म्हणत भव्य स्वागत करण्याची प्रथा शहरात रुजत आहे. याचाच प्रत्यय बोपोडीतही आला. गायकवाड कुटुंबात आतषबाजीत मिरवणुकीने घरी स्वागत करत गुढीपाडवा साजरा केला. मंगेश गायकवाड यांच्या घरी तिसऱ्या पिढीनंतर मुलगी जन्मास आली. त्यामुळे तिच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या. घराला सजावट केली. तिची पाऊले कुंकवाच्या पाण्यात भिजवून घरात उमटविली.