अशुद्ध भाषेच्या ‘प्रहारा’मुळे बहरला अभिनय

अशुद्ध भाषेच्या ‘प्रहारा’मुळे बहरला अभिनय

अशुद्ध भाषेच्या ‘प्रहारा’मुळे बहरला अभिनय

उद्योगनगरीतील कलाकार साकोरे यांची वाटचाल; ‘टीडीएम’द्वारे झळाळी

अश्विनी पवार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ : केवळ भाषा शुद्ध बोलत नसल्याने त्याला एका शालेय नाट्यवाचन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. पण, तो नाराज झाला नाही. खचून गेला नाही. उलट, ‘हाच आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे,’ असे समजून भाषा सुधारण्यासाठी मेहनत घेतली. त्यावर प्रभुत्व मिळवले. पुढे आकाशवाणी निवेदकापासून प्रवास सुरू केला. आता एक अभिनेता म्हणून तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘टीडीएम’ चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. शहरातील संदीप साकोरे यांचीही यशस्वी वाटचाल वाखाणण्याजोगी आहे.
भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ हा मराठी चित्रपट येत आहे. त्याचे ट्रेलर व्हायरल होत आहेत. त्यात संदीप यांची चेअरमनची भूमिका आहे. गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये विविध भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. एक स्पॉट बॉय ते चित्रपटाचा खलनायक हा त्यांचा प्रवास जितका खडतर तितकाच थक्क करणारा आहे. शालेय जीवनापासूनच साकोरे यांना अभिनयाची आवड होती. त्यांच्या मराठी सिनेसृष्टीपर्यंतच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचे प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या शाळेत झाले. नंतर पुण्यातील नामांकित शाळेत प्रवेश मिळाला. याचवेळी केवळ भाषा शुद्ध नसल्याने एका नाट्यवाचन स्पर्धेतून त्यांना बाहेर पडावे लागले. हाच आपल्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट असल्याचे ते सांगतात. या घटनेने खचून न जाता त्यांनी आपल्या भाषेवर काम करायला सुरुवात केली. भाषेची शुद्धता, आवाजातील चढ-उतार यावर त्यांनी विशेष मेहनत घेतली. याच मेहनतीच्या जोरावर त्यांनी आकाशवाणी येथे निवेदक म्हणून काम सुरू केले. १९८७ मध्ये ‘स्वामी’ मालिकेच्या निमित्ताने त्यांचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत असताना त्यांनी या मालिकेसाठी स्पॉटबॉय म्हणून काम केले. त्यांचे काम पाहून काही काळातच दिग्दर्शन विभागात त्यांची वर्णी लागली. शिक्षण, खासगी नोकरी आणि अभिनय अशा तिन्ही आघाड्यांवर एकाच वेळी काम करताना निवेदक म्हणूनही त्यांनी काम सुरू ठेवले. आज उत्तम निवेदकाबरोबरच मराठी सिनेमांमध्येही उत्तमोत्तम भूमिकांमध्ये ते झळकत आहेत.

‘‘२००४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘संत तुकाराम’ या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. दिशा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्यासोबत त्यांची ओळख झाली. त्यांनी ‘टीडीएम’साठी साकोरे यांची निवड केली. खलनायकाच्या भूमिकेसाठी सहा महिने दाढी वाढवली.’’
- संदीप साकोरे, अभिनेता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com