आषाढी वारी सोहळ्यात 
‘इस्कॉन’ दिंडीचा सहभाग

आषाढी वारी सोहळ्यात ‘इस्कॉन’ दिंडीचा सहभाग

पिंपरी, ता. ६ ः धार्मिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या आंतरराष्ट्रीय भावनामृत संघ अर्थात ‘इस्कॉन’ची ‘हरे कृष्ण संकीर्तन दिंडी’ संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यासोबत सहभागी होणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून दिंडी सोहळा सुरू असून, देशभरातील कृष्णभक्त देहू ते पंढरपूर अशी पायी वारी करतात. या वारीसाठी दिंडीची तयारी इस्कॉनच्या रावेत येथील मंदिरात सुरू आहे.
‘वारकरी संप्रदाय आणि ‘ब्रह्ममध्वगौडय संप्रदाय वेगवेगळे असले, तरी ते भक्तीमार्गाशीच जोडलेले आहेत. त्यामुळे दोन्ही सांप्रदायांतील विचारांची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशानेच आषाढी वारीनिमित्त दिंडीची सुरुवात केली आहे, अशी माहिती रावेत येथील इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष जगदीश गौरांग यांनी दिली. या निमित्ताने तुकोबारायांच्या जीवनचरित्रावरील ग्रंथांचे सवलतीच्या दरात वाटप करणे, अध्यात्माचा प्रचार व प्रसार करणे असे उपक्रम दिंडीमार्फत राबवले जाणार आहेत. दरवर्षी दिंडीला देशभरातील भक्तांकडून प्रतिसाद मिळत असून, यावर्षी साडेतीनशेहून अधिक कृष्णभक्तांनी दिंडीसाठी नोंदणी केली आहे. ज्यामध्ये सर्व वयोगटातील भक्तांचा समावेश आहे. शुक्रवारी (ता. ९) सर्व भक्त रावेत येथील इस्कॉन मंदिरात दाखल होतील. त्यांनतर तुकोबारायांच्या पालखी प्रस्थानाबरोबरच ही दिंडीही पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्या अनुषंगाने सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. पालखी मार्गावर इस्कॉनच्याच मंदिरांमध्ये या दिंडीचा मुक्काम नियोजित असल्याचंही गौरांग यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com