प्रलंबित, रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रलंबित, रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार
प्रलंबित, रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार

प्रलंबित, रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः कोरोना, लॉकडाउन, फेब्रुवारी २०२२ मध्ये मुदत संपल्याने महापालिकेत लोकप्रतिनिधींचा अभाव अशा कारणांमुळे अनेक प्रकल्प जवळपास एक वर्षापासून रखडले आहेत. काही प्रकल्प न्यायप्रविष्ट आहेत. अशी सर्व प्रकल्प नवीन वर्षात पूर्ण करून नागरिकांना सोयीसुविधा पुरुवण्याचा संकल्प महापालिका प्रशासनाने केला आहे. उत्तम दर्जाचे रस्ते तयार करून, प्रलंबित, रखडलेले, अपूर्ण राहिलेले व सुरक्षेसाठी संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यान्वित करणे, असे अत्यावश्यक नवीन प्रकल्प पूर्ण करण्याचे उदिष्ट महापालिकेने ठेवले आहे.
शहरातील वाहनांची वाढती संख्या विचारात घेऊन वाहनतळांची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘पार्किंग सुविधा वाढ व ट्राफिक समस्येवर उपाययोजना’, ‘नागरिकांना चांगल्या पायाभूत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिजाऊ क्लिनिक्सची निर्मिती’, मासुळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालय सुरू करणे’, ‘सर्व रुग्णालयांत दंत रोग विभाग स्थापन करणे’, पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना घरांचे वाटप’, ‘वायसीएममध्ये नर्सिंग कॉलेज सुरू करणे,’ ‘स्टेट ऑफ आर्ट मध्यवर्ती ग्रंथालय सुरू करणे’, ‘यशदा’च्या सहकार्याने सुसज्ज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे,’, ‘जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचे सुशोभीकरण करणे’, ‘अर्बन स्केपिंग प्रकल्प पूर्ण करणे,’, ‘नदी सुधार प्रकल्पांतर्गत मुळा, पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प पूर्ण करणे,’ ‘स्मार्ट सिटी अंतर्गत प्रलंबित कामे पूर्ण करणे’, ‘सुरक्षेच्या दृष्टिने सर्व शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते सुरू करणे’ अशा प्रकल्पांवर महापालिका नवीन वर्षात भर देणार असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

काही महत्त्वाचे रस्ते प्रकल्प
- भक्ती-शक्ती निगडी ते मुकाई चौक किवळे बीआरटीएस रस्ता
- बोपखेल आणि खडकी बाजार यांना जोडणारा मुळा नदीवरील पूल
- पिंपरीगाव ते पुणे-मुंबई महामार्ग यांना जोडणारा लोहमार्गावरील डेअरी फार्म पूल
- निगडी ते भोसरी स्पाईन रस्त्याचे त्रिवेणीनगर येथील राहिलेले (मिसिंग लिंक) काम
- काळेवाडी फाटा ते चिखली बीआरटी रस्त्यावरील आयुक्त बंगल्यासमोरील रस्ता

स्वच्छतेवर भर
- शहर सुशोभीकरणासाठी विविध उपक्रम
- स्वच्छता अभियानावर भर, जनजागृती
- स्वच्छतेसाठी चालून व नवीन योजना, प्रकल्प राबवून व्याप्ती वाढविणे
- ‘नवी दिशा’ व ‘शून्य कचरा’ उपक्रम राबविणे
- अठरा मीटरपेक्षा रुंद रस्त्यांची यांत्राद्वारे स्वच्छता

बहुउद्देशीय प्रकल्प
- मोशी बायोमायनिंग प्रकल्प
- हॉटेल वेस्टपासून गॅस निर्मिती
- वेस्ट टू एनर्जी प्रकल्प
- ‘शिक्षणाचा जल्लोष’ गुणवत्ता वाढीवर भर
- चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प