अवती भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवती भवती
अवती भवती

अवती भवती

sakal_logo
By

‘राष्ट्रीय स्मारक म्हणून
भिडेवाड्याला घोषित करा’
पिंपरी, ता. ४ ः पुण्यातील भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी केली. यावेळी जिजाऊ संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता शिंदे व उपाध्यक्षा माणिक शिंदे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे शहराच्या अध्यक्ष सुभाष देसाई , सचिन सुरेश इंगळे, वसंतराव बागडे, अण्णा भाऊ साठे सेवा संघाचे अध्यक्ष सुधीर कांबळे, ॲड. सुनील रानवडे, वृषाली मरळ, बाबूराव फुले, ईश्वरलाल चौधरी, शांताराम सातव, हेमचंद्र जावळे, जगन्नाथ नेरकर उपस्थित होते.

पोलिस स्थापनादिनाचा कार्यक्रम
चिंचवड पोलिस स्टेशन येथे पोलिस स्थापना दिनाचा कार्यक्रम झाला. चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे व पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश जाधव यांनी मार्गदर्शन केले. श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या विभागाचे अकरावी शास्त्र शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते. चिंचवड पोलिस स्टेशन येथील अधिकारी पीएसआय पोटे तसेच पीएसआय मोरे यांनी चिंचवड पोलिस स्टेशन येथे कशा पद्धतीने कामकाज चालते, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे सतीश भारती, धनंजय कुलकर्णी आणि शांतता समितीचे सदस्य सुभाष मालुसरे उपस्थित होते.


सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
रयत विद्यार्थी विचार मंच व माता रमाई मागासवर्गीय संस्था यांच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. अध्यक्ष धम्मराज साळवे व माता रमाई मागासवर्गीय संस्थेच्या अध्यक्षा सविता ओव्हाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. धनादेश व महामानवांचे जीवन कार्यावर आधारित पुस्तके देण्यात आले. प्रदेश महासचिव संतोष शिंदे , मावळ प्रमुख अतुल वाघमारे ,महासचिव प्रा. विक्रांत शेळके, खजिनदार नितीन ओव्हाळ, उपाध्यक्ष रोहिणी निकम, सहसचिव नलिनी गायकवाड, सल्लागार ललिता लवांडे, सदस्य सुमन भोसले, नीलम ओव्हाळ, पूनम निकम, सुशीला देवकुळे उपस्थित होते.

शिबिरात ११६ जणांचे रक्तदान
नर्मदेश्‍वर शिक्षण प्रसारक मंडळ व जपा सोशल फाउंडेशन आयोजित कृतज्ञता दिन सोहळा पार पडला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला कृष्णानगर येथे रक्तदान शिबिर घेतले. तब्बल ११६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे उद्घाटन सहसचिव हेमंत गडसिंग, उपाध्यक्ष प्रमोद जगताप, ज्येष्ठ संचालक महालिंग, ज्येष्ठ संचालिका शैलजा सिंग, संचालक के. व्ही.जाधव, प्राचार्य एस. एस. तिकटे, उपप्राचार्य बी. यू. सातपुते, पर्यवेक्षक एस. ए. जाधव, जपा सोशल फाउंडेशनचे संस्थापक बी. जे. मुलाणी उपस्थित होते. वाय.सी.एम. ब्लड बॅंकेचे सहकार्य मिळाले. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले.