धारिवाल इन्स्टिट्युट फार्मास्यिटिकलमध्ये नॅक पिअर टीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारिवाल इन्स्टिट्युट फार्मास्यिटिकलमध्ये नॅक पिअर टीम
धारिवाल इन्स्टिट्युट फार्मास्यिटिकलमध्ये नॅक पिअर टीम

धारिवाल इन्स्टिट्युट फार्मास्यिटिकलमध्ये नॅक पिअर टीम

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ, चिंचवड संचलित रसिकलाल. एम. धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यिटिकलमध्ये नॅक परिषदेकडून नॅक पिअर टीम यांनी शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात भेट दिली. महाविद्यालयास अ+ दर्जा मिळाला असून सीजीपीए ग्रेड ३.४६ मिळाला आहे. या भेटीत टीमने मुलांसाठी असणाऱ्या भौतिक सुविधांची पाहणी केली. पालक, प्राध्यापक, माजी विद्यार्थी यांच्यासमवेत संवाद साधला. महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली. नॅक मानांकनाचे काम संस्थेचे अध्यक्ष प्रकाशचंद धारिवाल, कार्याध्यक्ष शांतीलाल लुंकड, जनरल सेक्रेटरी राजेंद्र मुथा, कोषाध्यक्ष प्रकाशचंद चोपडा, सहायक सेक्रेटरी राजेश साकला, अनिल कांकरिया व सदस्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. प्राचार्य डॉ. संजय वालोदे तसेच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सर्वांनी अभिनंदन केले.