
रावेतमध्ये अनधिकृत डम्पिंगच्या प्रमाणात वाढ
पिंपरी, ता. ७ ः रावेतमध्ये ठिकठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे. बेशिस्त नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला, महावितरणच्या फिडर शेजारी आणि उघड्यावर कचरा टाकला जातो. अनधिकृत डम्पिंग ही एक मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा टाकणे ही नागरिकांसाठी एक सामान्य गोष्ट झाली आहे. अनधिकृत कचरा टाकण्याची ही प्रथा दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यावरण स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नांना हानी पोहोचत आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.
प्रीती पाटील म्हणाल्या, ‘‘रावेतमधील परिसराचे डम्पिंग ग्राऊंडध्ये रूपांतर झाले आहे. तसेच डासांची उत्पत्ती होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे आजूबाजूचे वृद्ध रहिवासी आजारी पडले आहेत. अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे.’’
रमेश शिंदे म्हणाले,‘‘ रावेत परिसरात खासगी विकासकांच्या विविध बांधकाम प्रकल्पाजवळ कचऱ्याचे ढीग पडले आहेत. याठिकाणी स्वच्छता महत्त्वाची आहे. लोकांची गैरसोय होणार नाही, याची खात्री महापालिका अधिकाऱ्यांनी करावी. या ठिकाणी चालण्याच्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसतात.’’
श्रेयश कदम म्हणाले, ‘‘मी गेल्या दहा वर्षांपासून रावेत येथे राहतो. आजूबाजूच्या परिसरात रस्त्याच्याकडेला कचरा टाकणे हा काही लोकांचा नेहमीचा सराव आहे. अलीकडेच रात्रीच्या वेळी माझी दुचाकी ओल्या कचऱ्यावरून घसरल्याने दुखापत झाली.’’
वीणा भगत म्हणाल्या, “या भागात चांगल्या सुविधा आहेत. म्हणून लोकांनी घर घेतले. पण लोकांच्या हलगर्जीपणामुळे हा सुंदर परिसर अस्वच्छ झाला आहे. जेव्हा कचरा बराच काळ साचतो, तेव्हा विषारी पदार्थ, रसायने मातीमध्ये झिरपतात, ज्याचा परिणाम झाडांवर होतो.