धर्मात येण्यास उद्युक्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धर्मात येण्यास उद्युक्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
धर्मात येण्यास उद्युक्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

धर्मात येण्यास उद्युक्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : एका धर्मातून दुसऱ्या धर्मात येण्यासाठी उद्युक्त केल्याप्रकरणी तिघांवर दिघी व आळंदी पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. सुधाकर बाबूराव सूर्यवंशी व त्याचे दोन साथीदार (रा. मुंजाबा वस्ती, धानोरी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. आळंदी येथे उद्धव नागनाथ कांबळे (रा. पद्मावती रोड, आळंदी, मूळ- लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी साठेनगर येथे फिर्यादी व त्यांच्या समाजातील इतर लोकांना त्यांचा धर्म सोडण्यासाठी त्यांच्यावर धर्माचा प्रभाव पाडला. आरोपींच्या धर्मात येण्यास उद्युक्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अशीच फिर्याद दिघी ठाण्यात विशाल रामचंद्र पवार (रा. एमआयटी कॉलेजच्या बाजूला, इंद्रायणीनगर) यांनी दिली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.