धूळखात पडलेले स्वच्छतागृह पून्हा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धूळखात पडलेले स्वच्छतागृह पून्हा सुरू
धूळखात पडलेले स्वच्छतागृह पून्हा सुरू

धूळखात पडलेले स्वच्छतागृह पून्हा सुरू

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ७ : शाळा चौकातील गणेश वाचनालयाच्या मागील बाजूस असलेल्या जुन्या स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, चार महिन्यांपासून वापराविना धुळ खात पडले होते. ते बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. तसेच महिलांची कुचंबणा होत होती. नागरिक उघड्यावर लघुशंका करीत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत होती. या संदर्भात ‘सकाळ’ मध्ये बातमी प्रसिद्ध होताच. दुसऱ्याच दिवशी संबंधित प्रशासनाने स्वच्छतागृह सुरू केले. शहरात दुरुस्ती केलेले २४ स्वच्छतागृह असून ती सर्व सुरू झाली होती. मात्र शाळा चौकातील एकमेव स्वच्छतागृहाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे असून खोळंबा नसून फक्त प्रतिक्षा अशी गत नागरिकांची झाली होती. स्वच्छतागृह सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच ‘सकाळ’ला धन्यवाद दिले.