Mon, Feb 6, 2023

मोशीतील टोलनाका
बंद करण्याची मागणी
मोशीतील टोलनाका बंद करण्याची मागणी
Published on : 9 January 2023, 11:36 am
पिंपरी, ता. ७ : पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे पथकर वसुली टोलनाका पुन्हा सुरू करण्यात आला असून, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून टोल वसुली केली जात आहे. मात्र, यामुळे वाहनचालकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे टोलवसुली तात्काळ बंद करावी, अशी मागणी भाजप वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.
याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राजगुरुनगर, चाकण आणि नाशिक फाटा या पट्ट्यात नियमित वाहतूक कोंडीने वाहन चालक त्रस्त आहेत. टोल नाका बंद झाल्याने मध्यंतरी काही काळ वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, ५ जानेवारी २०२३ पासून पुन्हा टोलवसुली केली जात आहे.