भारतात कोरोना लाटेची शक्यता कमी ः गोडसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतात कोरोना लाटेची 
शक्यता कमी ः गोडसे
भारतात कोरोना लाटेची शक्यता कमी ः गोडसे

भारतात कोरोना लाटेची शक्यता कमी ः गोडसे

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ ः भारतामध्ये कोरोनाची लाट येण्याची शक्यता कमी आहे. मात्र, आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे, असे मत प्रख्यात डॉ. रवी गोडसे (अमेरिका) यांनी व्यक्त केले.
जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आयोजित ‘१८ वे जागतिक मराठी संमेलन’ पिंपरी येथे सुरू आहे. शनिवारी दुपारच्या सत्रात ‘जागतिक आरोग्य व्यवस्था आणि भारत’ हा परिसंवाद झाला. त्यामध्ये ते बोलत होते.

परिसंवादात ‘आयसीएमआर’चे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. श्रीकांत चिंचालकर (कॅनडा), डॉ. मकरंद जावडेकर (अमेरिका) सहभागी झाले होते. डॉ. शंतनू अभ्यंकर (सातारा) यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्रेक्षकांची मोठी गर्दी होती.
डॉ. गोडसे म्हणाले, ‘‘आपला देश हा महाशक्ती झाला पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आवश्यक धोरणे राबविण्यात येत असून, त्याबरोबर लोक शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. आपल्या देशात आणखी संशोधन होण्यास वाव आहे. मात्र त्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. त्याकरता मानसिकता तयार केली पाहिजे.’’