पवनमावळात ढगाळ हवामानाचा पिकांना धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवनमावळात ढगाळ हवामानाचा पिकांना धोका
पवनमावळात ढगाळ हवामानाचा पिकांना धोका

पवनमावळात ढगाळ हवामानाचा पिकांना धोका

sakal_logo
By

सोमाटणे, ता. ८ ः ढगाळ व बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोग निर्माण होण्याच्या शक्यतेने पवनमावळातील शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. यावर्षी भरपूर पाऊस पडल्याने सर्वच पिके चांगली वाढल्याने उत्पादन वाढण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात असतानाच गेल्या चार दिवसापासून हवामानात अचानक मोठा बदल झाला असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचा फटका गहू, हरभरा, वाटाणा, कांदा, ज्वारी, आंबा पिकाला बसला आहे. हरभरा पिकावर आळी निर्माण झाली असून गव्हावर तांबेरा रोगाचे जंतू निर्माण झाले आहे. ज्वारी भाजीपाला पिकावर तेलकट थर पडू लागला आहे. आंब्याचा मोहर गळून पडण्याला सुरुवात झाली आहे. बदलत्या हवामानामुळे सर्वच पिकावर रोग पसरण्यास सुरवात झाली आहे. रोगाचा सर्वच पिकाला फटका बसणार असल्याचे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी पिकासाठी केलेला खर्च निघण्याची शक्यता मावळली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने तातडीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन शेतकरी वर्गाने केले आहे.

फोटो-पाचाणे,Smt८Sf१.
--------------------------------------------------------------------------