नागेश्वर विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागेश्वर विद्यालयाचे
स्नेहसंमेलन उत्साहात
नागेश्वर विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

नागेश्वर विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० : चिखलीतील श्री नागेश्वर विद्यालय २००५-२००६ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन यशस्वीपणे झाले. त्यावेळी उपस्थित वी. एम. शिंदे पी. बी. शिंदे उपस्थित होते. माजी शिक्षकवृंद व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होत्या.
अमर जाधव, अमृत नेवाळे हे दोन विद्यार्थी महाराष्ट्र पोलिस प्रशासनाच्या सेवेत कार्यरत असल्यामुळे त्यांचे सत्कार करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. शाळेसाठी लागणारे वस्तू, प्रत्येक वर्गात २० पंखे, विद्युत दिवे व झाडांना पाणी देण्यासाठी पाइप देण्यात आले. विद्यार्थी आणि शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांच्या डोळ्यातून आठवणीत कायम असणारे हुशार व खोडकर मुलांप्रती अश्रू अनावर झाले. कार्यक्रमाचे आयोजन २००६ च्या दहावी ई आणि फ या दोन तुकड्यांच्या विद्यार्थ्यांनी केले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी सागर लोखंडे, राजेश डोंगरे, विशाल बनकर, विनायक गोसावी, बापू सरोदे, शेखर रोकडे, समीर मोरे, प्रमोद घनवट, स्वाती कुऱ्हाडे, जयश्री पांडव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार काळुराम शिंदे, मिथुन गोसावी यांनी पार पाडले.