फत्तेचंद जैन विद्यालयात विविध गुणदर्शन सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फत्तेचंद जैन विद्यालयात
विविध गुणदर्शन सोहळा
फत्तेचंद जैन विद्यालयात विविध गुणदर्शन सोहळा

फत्तेचंद जैन विद्यालयात विविध गुणदर्शन सोहळा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० : श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान विभागाचा गुणगौरव व विविध गुणदर्शन सोहळा पार पडला.
संस्थेचे अध्यक्ष प्रकाशचंद धारीवाल, कार्यकारणी सदस्या दिना धारीवाल, संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड. राजेंद्र मुथा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, पोलिस अधीक्षक संजय शिंत्रे उपस्थित होते. तसेच, कार्यक्रमासाठी संस्थेच्या विविध विभागांचे प्राचार्य, उपप्राचार्य व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.

विज्ञान शाखेच्या बारावी परीक्षेतील उत्कृष्ट गुण मिळवलेल्या प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विभागीय व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचाही सत्कार केला. प्राचार्या सुनीता नवले यांना मिळालेल्या सावित्री जिजाऊ पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.
महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे तसेच वाड्मय मंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. दीपक मुनोत यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. माजी प्राचार्य प्रकाश कटारिया यांनी विचार व्यक्त केले. सांस्कृतिक विभागातर्फे विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले. संपूर्ण भारतीय संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमाद्वारे सादर करण्यात आले. क्रीडा पारितोषिकांचे वाचन शामसुंदर गवळी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. उपप्राचार्य गुंजाळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.