कॉलेज विश्‍व भौतिकशास्त्र अभ्यासमंडळावर प्रा. माधव सरोदे यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉलेज विश्‍व 

भौतिकशास्त्र अभ्यासमंडळावर 
प्रा. माधव सरोदे यांची निवड
कॉलेज विश्‍व भौतिकशास्त्र अभ्यासमंडळावर प्रा. माधव सरोदे यांची निवड

कॉलेज विश्‍व भौतिकशास्त्र अभ्यासमंडळावर प्रा. माधव सरोदे यांची निवड

sakal_logo
By

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळावर महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. माधव सरोदे यांची निवड झाली आहे. प्रा. सरोदे यांना अध्यापनाचा ३० वर्षांचा अनुभव असून, त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनियतकालिकांमध्ये अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी भौतिकशास्त्र विषयातील अनेक ग्रंथ लिहिले असून, त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव
आहे. त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांनी अभिनंदन केले


मोरे महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिर
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघ व संजीवनी रक्तपेढी भोसरी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, माजी विद्यार्थी संघाचे ज्ञानेश्वर कुटे, उद्योजक दत्ता भालेकर, विजय लांडगे, उपप्राचार्य डॉ. बी. जी. लोबो, डॉ. एच. बी. सोनावणे, समन्वयक प्रा. सुजाता टापरे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. डी. आर. शिंदे, डॉ. रश्मी मोरे, डॉ. पद्मावती इंगोले उपस्थित होते. रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट ज्ञानेश्वर चिमटे व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. रामदास लाड यांनी केले. अनुराग पाटील आणि नरेंद्र अहिरे यांचे सहकार्य लाभले.

तेजस करंडक क्रिकेट टूर्नामेंट

पुणे विभागातील फार्मसी महाविद्यालयांच्या प्राध्यापक व प्राध्यापकेत्त्तर कर्मचाऱ्यांसाठी डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाने ‘तेजस करंडक क्रिकेट टूर्नामेंट’ स्पर्धा घेतली. या सामन्यांचे उद्घाटन संकुलचे संचालक रिअर ऍडमिरल अमित विक्रम (सेवानिवृत्त) यांच्या हस्ते झाले. या दोन दिवसीय सामान्याचे विजयी संघ इंदिरा औषधनिर्माण महाविद्यालय, ताथवडे यांना डॉ.डी.वाय.पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच उप विजेते चषक डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालय यांनी मिळविला. ‘मॅन ऑफ दि मॅच’ डॉ. आमीर शेख (इंदिरा कॉलेज), बेस्ट बॉलर -डॉ. राहुल बुचडे(इंदिरा कॉलेज) बेस्ट बॅटमॅन - पवन माने (डी. वाय. पाटील कॉलेज आकुर्डी) यांनी पटकावले. आयोजन क्रीडा प्रभारी डॉ. वैभव वैद्य , मुकेश मोहिते, डॉ. संकेत कदम यांनी केले. आयोजक डॉ. वैभव वैद्य यांनी प्रास्ताविक केले.


सुमीत शशिकांत मुडेचे यश
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयाच्या एम. फॉर्म द्वितीय वर्षाचा विद्यार्थी सुमीत शशिकांत मुडे याला वैद्यकीय जैवतंत्रज्ञान (औषधेतील सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा वापर) या विषयावरील सर्वोत्कृष्ट संशोधन सादरीकरणासाठी आयबीएस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय जैवतंत्रज्ञानातील सध्याच्या ट्रेंड् वरील राष्ट्रीय परिषद : आरोग्यदायी जीवनासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनआणि सोसायटी फॉर बायोटेक्नॉलॉजिस्ट (इंडिया) च्या वार्षिक बैठकीत प्रमाणपत्र आणि सर्वोत्कृष्ट संशोधन सादरीकरण या साठी आयबीएस पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे आयोजन जैवतंत्रज्ञान विभाग, शासकीय पदवी महाविद्यालय (पुरुष) श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश आणि सोसायटी फॉर बायोटेक्नॉलॉजिस्ट (इंडिया) यांच्यावतीने करण्यात आले होते. सुमितला प्रा. मुकेश मोहित यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

आश्लेषा बर्डे, मुस्कान पठाण यांचे यश
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी अश्लेषा बर्डे, मुस्कान पठाण, दर्शिता मखीजा यांनी ‘गरिबांचे हिवाळ्यातील जीवन’ या विषयावर निबंध लिहून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले. मुंबईच्या ॲकॅडमीक डिसीफरने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या तीनही विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि ५००० रुपये रोख
बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्यांना सहायक प्राध्यापिका पूजा पवार यांचे मार्गदर्शन लाभले.