चिंचवडगावच्या बस स्थानकात चौकशी कक्ष केबिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवडगावच्या बस स्थानकात
 चौकशी कक्ष केबिन
चिंचवडगावच्या बस स्थानकात चौकशी कक्ष केबिन

चिंचवडगावच्या बस स्थानकात चौकशी कक्ष केबिन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ ः पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपीएमएल) चिंचवडगाव येथील बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन चौकशी केबिन पीएमपीएमएल मुख्यालय क्र. २ चे प्रमुख सुनील दिवाण यांच्या हस्ते फीत कापून सुरु करण्यात आली.
चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, मुकेश चुडासमा, ज्येष्ठ नागरिक संघाचे बबन चव्हाण, महाव्यवस्थापकीय अध्यक्ष ओमप्रकाश बकोरीया, शिवरत्न बाणे, स्थानकप्रमुख बाळासाहेब ढोले, निवृत्त कर्मचारी चंदू वाले, प्रवासी सज्जू जगताप समवेत विविध डेपोचे प्रमुखांच्या उपस्थितीत केबिनचे पूजन केले.
चिंचवड प्रवासी संघाच्यावतीने करण्यात आलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात प्रयत्न करू, असे आश्वासन सुनील दिवाण यांनी दिले.