ओसीटी मशीनची फेरनिविदा काढावी भाजपचे माजी पक्षनेते एकनाथ पवार यांची मागणी - भाजपचे माजी पक्षनेते एकनाथ पवार यांचे आयुक्तांना पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओसीटी मशीनची 
फेरनिविदा काढावी
भाजपचे माजी पक्षनेते एकनाथ पवार यांची मागणी
- भाजपचे माजी पक्षनेते एकनाथ पवार यांचे आयुक्तांना पत्र
ओसीटी मशीनची फेरनिविदा काढावी भाजपचे माजी पक्षनेते एकनाथ पवार यांची मागणी - भाजपचे माजी पक्षनेते एकनाथ पवार यांचे आयुक्तांना पत्र

ओसीटी मशीनची फेरनिविदा काढावी भाजपचे माजी पक्षनेते एकनाथ पवार यांची मागणी - भाजपचे माजी पक्षनेते एकनाथ पवार यांचे आयुक्तांना पत्र

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) रुग्णांचे डोळे तपासणीसाठी भांडार विभागाने ऑप्टिकल सुसंगत टोमोग्राफी (ओसीटी) मशिनची खरेदी केली आहे. ती खरेदी करताना भांडार उपायुक्त, वैद्यकीय अधिष्ठाता, बॉयोमेडिकल इंजिनिअर यांनी ठेकेदाराशी केलेल्या दुर्लक्षामुळे ओसीटी मशिन खरेदीत गैरव्यवहार झाला असून, ठेकेदाराने स्पेसिफिकेशन बदलून, मशिनचा पुरवठा केला आहे. त्यामुळे ओसीटी मशिन निविदा रद्द करून फेरनिविदा काढावी, अशी मागणी भाजपचे माजी पक्षनेते एकनाथ पवार यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
महापालिकेच्या भांडार विभागाने वायसीएम रुग्णालयातील पीजीआय नेत्र विभागाच्या मागणीनुसार, ऑप्टिकल सुसंगत टोमोग्राफी (ओसीटी) मशिन खरेदीची निविदा प्रक्रिया राबवली होती. भांडार विभागाने जेम पोर्टलवर सुमारे ९० लाख रुपयांच्या मशिन खरेदीस निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार आद्या प्रॉपर्टीज आणि आर्थरॉन टेक्नॉलॉजीज हे दोन ठेकेदार पात्र ठरले. कमी दरातील क्रमांक एकच्या आद्या प्रॉपर्टीज ठेकेदाराने ५५ लाख ८८ हजार दराने ह्युवीटीज लि. या कोरियन कंपनीचे तर; कमी दराच्या क्रमांक दोनच्या आर्थरॉन टेक्नॉलॉजीज आणि एंटरप्राइजेस ठेकेदाराने ६३ लाख रुपये दराने झेनीस, या जर्मन कंपनीचे मशिन दिले जाणार होते.

वायसीएम नेत्र विभागात ओसीटी मशीनने रुग्णाच्या डोळ्याची तपासणी करण्यात येणार आहे. ''ओसीटी'' मशिन खरेदीत मनपाने दिलेले स्पेसिफिकेशन आणि ठेकेदाराचे स्पेसिफिकेशनमध्ये खूपच तफावत आहे.
- एकनाथ पवार, माजी पक्षनेते, भाजप.

ओसीटी मशीनबाबत अद्याप अहवालच आला नाही. त्यामुळे अटी, शर्तीनुसार सर्वात कमी दराच्या ठेकेदाराने निविदा भरली की नाही हे सांगू शकत नाही.
- मनोज लोणकर, उपायुक्त, भांडार विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका.