Fri, Feb 3, 2023

वाचकपत्र
हॉटेलमध्ये बेकायदेशीर दारूविक्री
वाचकपत्र हॉटेलमध्ये बेकायदेशीर दारूविक्री
Published on : 12 January 2023, 10:06 am
निगडी येथील ट्रान्सपोर्टनगर या ठिकाणी पंचवीस ते तीस हॉटेलमध्ये बेकायदेशीर दारू विक्री सुरू आहे. त्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करून कारवाई करत नाही. आर्थिक देवाण-घेवाण करून बेकायदेशीर विना परवाना दारू विक्री सुरू आहे. पंधरा ते वीस हजार रुपये मासिक हप्ता घेण्यात येत आहे. तसेच, निगडी जकात नाका त्रिवेणीनगर सेक्टर २२ व आकुर्डी रेल्वे स्टेशन, आकुर्डी गावठाण, थरमॅक्स चौक, अजंठा नगर चिंचवड स्टेशन, भोसरी, पिंपरी, चिंचवडगाव, रावेत, काळेवाडी या ठिकाणी अवैध दारू विक्री बेकायदेशीरपणे सुरू आहे.
- सचिन काळभोर, निगडी