Mon, Feb 6, 2023

शरद यादव यांना श्रद्धांजली
शरद यादव यांना श्रद्धांजली
Published on : 13 January 2023, 9:50 am
पिंपरी, ता. १३ : माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांना नागरी हक्क सुरक्षा समितीच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
अध्यक्ष मानव कांबळे म्हणाले, ‘‘व्ही. पी. सिंग यांच्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी मंडल आयोग लागू करण्यासाठी निर्माण केलेला दबाव व आग्रहामुळे देशात मंडल आयोग लागू झाला होता. सत्तेमध्ये असतानाही सर्वसामान्य, दलित आदिवासींच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरण्यास त्यांनी कधीही मागे पुढे पाहिले नाही. प्रकृती साथ देत नसतानाही देशातील धर्मांध सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भाजप विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले होते. शरद यादव यांच्या निधनामुळे समाजवादी चळवळीची खूप मोठी हानी झाली आहे.’