पीएमपीच्या उत्पन्नात गतवर्षीपेक्षा वाढ प्रशासनाचा अहवाल ः दिवसाला २८ लाख रुपयांची भर, प्रवासी संख्याही एक लाखाने वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएमपीच्या उत्पन्नात गतवर्षीपेक्षा वाढ
प्रशासनाचा अहवाल ः दिवसाला २८ लाख रुपयांची भर, प्रवासी संख्याही एक लाखाने वाढली
पीएमपीच्या उत्पन्नात गतवर्षीपेक्षा वाढ प्रशासनाचा अहवाल ः दिवसाला २८ लाख रुपयांची भर, प्रवासी संख्याही एक लाखाने वाढली

पीएमपीच्या उत्पन्नात गतवर्षीपेक्षा वाढ प्रशासनाचा अहवाल ः दिवसाला २८ लाख रुपयांची भर, प्रवासी संख्याही एक लाखाने वाढली

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) बस गाड्यांचा वापर करणाऱ्या पुणे शहर व पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांमध्ये २०२१ च्या तुलनेत २०२२ या वर्षामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. गतवर्षी दिवसाकाठी तीन लाख असणाऱ्या प्रवाशांची संख्या ४ लाखांच्या पुढे गेली आहे. तर, दिवसाला सर्व फेऱ्यांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न ५० लाखांहून ७८ लाखांवर गेल्याचे पीएमपीएल प्रशासनाने दिलेल्या अहवालातून समोर आले आहे.

सध्या पीएमपीएलचे एकूण मुख्य आठ बीआरटी मार्ग पुणे जिल्ह्यात आहेत. नवीन व जुन्या मिळून एकूण बस गाड्यांची संख्या दोन हजारांपर्यंत गेली आहे. त्यातही इलेक्ट्रीक बस गाड्यांना प्रवाशांची पसंती अधिक मिळत आहे. सध्या नाशिक फाटा ते वाकड, निगडी ते दापोडी, संगमवाडी ते विश्रांतवाडी, सांगवी फाटा ते किवळे मुकाइ चौक, येरवडा ते वाघोली, काळेवाडी फाटा ते चिखली, स्वारगेट ते कात्रज हे एकूण आठ मुख्य मार्ग आहेत. या मार्गावर बसच्या फेऱ्या ८ हजाराच्यावर दैनंदिन सुरु आहेत. तसेच, २०२२ मध्ये बस गाड्यांची वारंवारिता दर १ मिनिटांपासून १० मिनिटांपर्यंत आहे. गाड्यांची उपलब्धता असल्याने प्रवाशांना कमी वेळ ताटकळत थांबावे लागते.

एकूण आठ मार्गावर थांब्याची संख्यादेखील ११७ पर्यंत गेली आहे. दिवसभरात ७१६ बसगाड्या सलग मार्गावर आहेत. यातील ९० टक्के बस नवीन आहेत. तर, स्वारगेट व कात्रज या मार्गावर सर्वाधिक जादा प्रवाशांची संख्या दैनंदिन एक लाखाच्यावर आहे. दर एक मिनिटाला या मार्गावरुन बसची संख्या आहे. तर, त्याचप्रमाणे निगडी ते दापोडी या मार्गावर दैनंदिन १ लाखाच्यावर प्रवासी संख्या असून, त्या माध्यमातून दिवसाला २१ लाख ४२ हजार इतके उत्पन्न पीएमपी प्रशासनाला मिळत आहे.
---
कोरोनामुळे २०२१ मध्ये प्रवासी संख्या घटली होती. त्यानंतर, पीएमपी खात्यात नवीन इलेक्ट्रीक बस आल्या. नवीन बसची संख्या वाढली. सध्या डेपो मॅनेजरच्या बैठका वेळेत होत आहेत. डेपोची माहिती घेणे. त्यांच्या त्रुटी दूर करणे. त्यामुळे, बसच्या फेऱ्या वाढल्या आहेत. युनियनच्या बैठका सुरु आहेत. जास्त गर्दीच्या ठिकाणी बस वाढविल्या आहेत. ज्या ठिकाणी प्रवासी आहेत, त्या ठिकाणी बस जादा सोडल्या जात आहेत.
- अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएल
--
बस गाड्यांची संख्या
इलेक्ट्रीक : ४००
सीएनजी : ४००
भाडे तत्वावारील : ८००
मिडी बस २००
--

आकडेवारी -
वर्ष २०२१ २०२२
फेऱ्या ११०५ ३३१६१
प्रवासी संख्या ३०४६५२ ४५११७१
उत्पन्न ५०३६८९९ ७८२६१५५
एकूण रस्ते १०५ ११९
---