Fri, Jan 27, 2023

सरसकट नळ कनेक्शन जोडून नका
सरसकट नळ कनेक्शन जोडून नका
Published on : 14 January 2023, 2:34 am
पिंपरी, ता. १४ : सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील काही सदस्यांनी मालमत्ताकर थकविल्याने पूर्ण सोसायटीचा पाणीपुरवठा कपात केला जात आहे. हा अन्याय आहे. अशा प्रकारची चुकीची मोहीम राबवू नये.अन्यथा पूर्ण मालमत्ताकर भरलेल्या संस्थांना सोबत घेऊन महापालिकेसमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाव्दारे चिखली-मोशी पिंपरी चिंचवड हौसिंग फेडरेशनने आयुक्त शेखर सिंह यांना दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार महेश लांडगे यांना दिले आहे.