मराठीचा प्रचार, प्रसारासाठी पालिकेत ‘मराठी’चा वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठीचा प्रचार, प्रसारासाठी 
पालिकेत ‘मराठी’चा वापर
मराठीचा प्रचार, प्रसारासाठी पालिकेत ‘मराठी’चा वापर

मराठीचा प्रचार, प्रसारासाठी पालिकेत ‘मराठी’चा वापर

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ ः मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी १४ जानेवारीपासून २८ जानेवारीपर्यंत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या सर्व कार्यालयांत व सार्वजनिक उपक्रमांमध्ये ‘मराठी युनिकोड’चा वापर करावा, अशी सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या आहेत, अशी माहिती, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिली.
महापालिका कार्यालयातील मराठीमधील कामकाजामध्ये अधिक सुसूत्रता आणणे, कुठल्याही संगणकावर तयार केलेल्या शासकीय कामकाजाची कागदपत्रे (नस्ती) कुठल्याही संगणकावर वाचता यावेत, भविष्यासाठी व्यवस्थितरीत्या जतन करणे सोईचे व्हावे, यासाठी महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये ‘युनिकोड’ मराठीचा वापर अनिवार्य केला आहे. तसेच, महापालिकेची सर्व कार्यालये व सार्वजनिक उपक्रमांत ‘मराठी युनिकोड’चा वापर करणे शक्य व्हावे, यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घ्यावे. या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना जांभळे यांनी केल्या आहेत.