सार्वजनिक मंडळांनी कार्यकारिणी जाहीर करून वर्गणी मागावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सार्वजनिक मंडळांनी कार्यकारिणी जाहीर करून वर्गणी मागावी
सार्वजनिक मंडळांनी कार्यकारिणी जाहीर करून वर्गणी मागावी

सार्वजनिक मंडळांनी कार्यकारिणी जाहीर करून वर्गणी मागावी

sakal_logo
By

रुपीनगर येथील मंडळ वार्षिक कार्यकारिणी जाहीर न करता बेकायदा वर्गणी मागत आहे. मंडळाचे अध्यक्ष, खजिनदार, सचिव कार्याध्यक्ष आदी कार्यकारिणी लोकांसमोर जाहीर न करता गणेश जयंतीची पावती मंडळ घेत आहे. वार्षिक जमा खर्च अहवाल ही या मंडळाकडून लोकांसमोर सादर केला जात नाही. फक्त वर्गणीची पावतीच्या माध्यमातून तीनशेपेक्षा जास्त रुपये लोकांकडून वसूल केले जात आहेत. धर्मदाय आयुक्त कार्यालयाने आणि परिसरातील कायदा सुव्यवस्था पाहणाऱ्या पोलिसांनी याची दखल घेऊन मंडळांना समज द्यावी. सार्वजनिक जयंती आणि उत्सवाच्या नावाखाली मध्यम वर्गाची लूट थांबवावी. राजकीय पुढाऱ्यांनी अशा मंडळांना वर्गणी देऊ नये. जो पुढारी जास्त देणगी देतो. त्या राजकीय पुढाऱ्याला गणपती आरतीचा मान दिला जातो. सार्वजनिक मोकळी जागा मंडळाच्या नावाखाली बळकावून तेथे पुढाऱ्यांची मदत घेऊन सभा मंडप टाकला जातो. पण, सर्वसामान्य माणसांनी सांगितलेले रस्ते डांबरीकरण करत नाहीत.
- राजेश जाधव, रुपीनगर