रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध ठिकाणी प्रबोधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत
विविध ठिकाणी प्रबोधन
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध ठिकाणी प्रबोधन

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध ठिकाणी प्रबोधन

sakal_logo
By

पिंपरी, ता. १८ : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विविध ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले. सप्ताहात कार्यालयाकडून सर्वांनी उत्तम प्रकारे योगदान देत जनजागृतीपर व्याख्याने व रॅली काढण्यात आली.
लोणावळा येथे १६ तारखेला तीन ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत कार्यक्रम घेण्यात आले. लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संचलित डॉ. बी. एन. पुरंदरे आर्ट, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय व सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, महाविद्यालय लोणावळा येथे कॉलेजच्या ४५० विद्यार्थी-विद्यार्थिनींना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व, सिट बेल्ट वापरण्याचे फायदे, मोबाईलवर बोलत वाहन चालवू नये तसेच, अति वेगाने वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात याबाबत नियम सांगितले. अपघातातील उदाहरणे चित्रफीत दाखवून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन केले. महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नवनियुक्त पोलिस शिपाई यांचेही प्रबोधन केले. यावेळी ३८१ जण उपस्थित होते.

हेल्मेट रॅलीद्वारे प्रबोधन
आरटीओ कार्यालय, मोशी प्राधिकरण व सर्व डिलर, ड्रायव्हिंग स्कूल चालक-मालक संघटना यांच्यावतीने हेल्मेट रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅली ट्रॅफिक पार्क येथून सुरू होऊन पिंपरी-चिंचवड शहराच्या काही मुख्य भागातून गेली. मोटार वाहन निरीक्षक बालाजी धनवे यांनी रस्ता सुरक्षा अभियानात जे उपक्रम राबवले. त्यांची माहिती दिली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत नियम पाळण्याचे आवाहन केले. तसेच, इ प्रतिज्ञा सर्टिफिकेट यांचे अनावरण केले.जुन्नर कॅंप येथे नवीन वाहन अनुज्ञप्ती चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांना वाहतूक नियमांबद्दल मार्गदर्शन केले. रस्ता सुरक्षेची प्रतिज्ञा घेतली. मोटार वाहन निरीक्षक अरविंद कुंभार, सहायक अमृत गोडसे, श्रेया मामोडे उपस्थित होते.