नवी सांगवीत पेन्शनधारकांचा मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी सांगवीत पेन्शनधारकांचा मेळावा
नवी सांगवीत पेन्शनधारकांचा मेळावा

नवी सांगवीत पेन्शनधारकांचा मेळावा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ : गेल्या सहा वर्षापासून पेन्शनधारक नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. त्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी इपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती, पिंपरी-चिंचवड शहर संघटनेच्यावतीने २३ तारखेला सोमवारी दुपारी ३ वाजता नवी सांगवी मधील नर्मदा गार्डन जवळील, न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर भव्य मेळावा होणार आहे.
७० लाख पैकी २३ लाख पेन्शनधारक यांना एक हजारपेक्षा कमी पेन्शन मिळत आहे. यामध्ये महागाई विचारात घेता जीवन जगणे पेन्शनधारकांना अवघड झाले आहे. याचा विचार केंद्र सरकारने तातडीने करावा. कमीतकमी पेन्शन रुपये ७५०, महागाई भत्ता व मोफत मेडिकल सुविधा, आदी मागण्या पूर्ण करून पेन्शन धारकांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सदर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव राऊत, राष्ट्रीय महासचिव वीरेंद्रसिंग राजावत, राष्ट्रीय मुख्य सल्लागार डॉ. पी. एन. पाटील, क्षेत्रीय संघटक प. भारत सुभाष पोखरकर, मुख्य समन्वयक सी. एम. देशपांडे व विलास पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील पेन्शनधारक नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पिंपरी-चिंचवड संघटनेचे अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत व उपाध्यक्ष तानाजी काळभोर यांच्यासह पुणे जिल्हा अध्यक्ष सतीश शिंदे, कार्याध्यक्ष सी.एम.राऊत, समन्वयक अजित घाडगे व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.