Fri, Jan 27, 2023

चिखलीत आगीतून तीन जणांची सुखरूप सुटका
चिखलीत आगीतून तीन जणांची सुखरूप सुटका
Published on : 19 January 2023, 9:58 am
पिंपरी, ता. १९ : चिखली पूर्णानगरमधील कामधेनू सोसायटी येथे दुकानाला आग लागल्याचे मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी-चिंचवड येथे बुधवारी (ता. १८) रोजी सायंकाळी आविष्कार विटकर यांनी कळविले होते. हे कळताच घटना स्थळाजवळील उपअग्निशमन केंद्र चिखली व तळवडे या दोन अग्निशमन केंद्रांतील जवानांनी तीन जणांची सुखरूप सुटका केली.
मुख्य अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन घटना स्थळी पोचले असता, इमारतीच्या तळमजल्यावर असलेले स्पिझा या रेस्टॉरंटला आग लागल्याचे निदर्शनास आले. जवानांनी अवघ्या १५ मिनिटाच्या कालावधीत आगीवर नियंत्रण मिळवले. धुरामुळे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील नागरिकांना खाली येता येत नव्हते. त्यांना जवानांनी सुखरूप बाहेर काढले.